Post Office GDS Online Apply : नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिस मध्ये निघालेल्या जागांसाठी ऑनलाईन अर्ज आपल्या मोबाईल वरून कसा करायचा याची संपूर्ण व परिपूर्ण माहिती येथे या पोस्ट मध्ये बघणार आहोत.
ग्रामीण डाक सेवक भरती 2024 | पोस्ट ऑफिस भरती ऑनलाईन अर्ज कसा करायचा | ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? | असिस्टंट ट्रान्सपोर्ट मास्टर या पदासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे याची परिपुर्ण माहिती मराठी भाषेमध्ये येथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
Post Office GDS ग्रामीण डाक सेवक भरती 2024
भारतीय टपाल खात्यामध्ये जवळ जवळ 44228 जागांसाठी भरती काढण्यात आलेली आहे. यासाठी फक्त दहावीच्या मार्कशिट यादीवर लावण्यात येणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा ही नाही आहे. तरी या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची परिपूर्ण माहिती आपण येथे या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.
विभाग | भारतीय डाक विभाग |
जागा | 44228 |
अर्ज करण्याची अंतिम मुदत | 5ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
सविस्तर माहिती | येथे क्लिक |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात.
ग्रामीण डाक सेवक या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रे आवश्यक लागणार आहेत.
- दहावीचे मार्कशीट
- फोटो
- सही
- आधार कार्ड नंबर
- मोबाईल नंबर
- जीमेल खाते
वरील कागदपत्र व संपुर्ण माहिती ही तुम्हाला पोस्ट ऑफिस चा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणार आहेत. वरील कागदपत्र तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये स्कॅन करून ठेवायची आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याच्या स्टेप
सर्वात आधी तुम्ही तुमची कागदपत्र एक फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवायची आहे. व त्यानंतर तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करायचे आहेत.
- सर्वात आधी तुम्हाला https://indiapostgdsonline.gov.in/ या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला खालील दिलेल्या प्रमाणे तुमचे पेज हे दिसत आहे.
- त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. येथे तुम्हाला तुमची सर्व पर्सनल डिटेल तुमचा मोबाईल नंबर, जीमेल आयडी, याची पडताळणी करायची आहे. यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे स्क्रीन दिसणार आहे.
त्यानंतर तुम्हाला खाली सर्व अर्ज भरून झाल्यानंतर तुमचा पत्ता, आणि तुम्हाला तुमचे प्रेफरन्स हे खाली दिल्या प्रमाणे निवडायचे आहेत.
त्यानंतर तुम्हाला अर्ज हा सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुम्हाला तुमच्या अर्जाची प्रिंट ही नक्कीच काढून घ्यायची आहे. किंवा त्याची पीडीएफ(PDF) जर तुमच्या मोबाईल मध्ये असली तरी चालते. ज्यावेळेस तुमची निवड होईल त्यावेळेस तुमच्या जीमेल वरती किंवा मोबाईल वरती एक मेसेज येत असतो.
तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ग्रामीण डाक सेवक या पदासाठी ऑनलाईन अर्ज हा करायचा होता. अर्ज करत असताना जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही खाली दिलेला कॉमेंट बॉक्स तुमचाच आहे तर कमेंट करून आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला मदत करणार आहे.
1 thought on “Post Office GDS Online Apply | ग्रामीण डाक सेवक या पदासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?”